आमचा असा विश्वास आहे की जी सरकारी धोरणे आणि कार्यक्रम तरुणांच्या जीवनावर आणि ते राहत असलेल्या समुदायांवर परिणाम करतात, त्याच्या निर्माण प्रक्रियेत तरुणांचा सहभाग अतिशय महत्वपूर्ण ठरेल. ह्यात सुसाईड प्रतिबंधाचाही समावेश होतो.
‘आउटलिव’ द्वारे तरुणवर्गाशी संपर्क साधला असता असे लक्षात आले की स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील धोरणांबद्दल असलेले वेगवेगळे दृष्टीकोन हे तरुणांमधील सुसाईड प्रतिबंधासाठी उपयुक्त ठरू शकतात.
युथ अडवोकेट्स हे तरुणांमधील सुसाईड प्रतिबंधात्मक पॉलीसी बनवण्यात सहभागी असलेल्यांना विविध धोरणात्मक उपायांवर लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त करू शकतात.
युथ अडवोकेट्स धोरणकर्त्यांना तरुणांमधील सुसाईड प्रतिबंधाच्या विविध कारणांना संबोधित करणारे कार्यक्रम आणि धोरणात्मक उपायांवर लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त करू शकतात. त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामधील तणाव आणि भेदभाव, सुसाईड प्रतिबंधासंबंधी उपायांचा अभाव, घरगुती हिंसाचार अशा घटकांचा समावेश होतो. तरुणांच्या हक्कांचे संरक्षण आणि समर्थन केले जाईल हे सुनिश्चित करण्याचीही क्षमता ह्यामध्ये आहे.