Skip to main content

Main navigation

जर आपत्कालीन परिस्थितीमध्ये घरेलू किंवा लैंगिक हिंसा, जात किंवा लैंगिकतेमुळे होणारा भेदभाव, चिंता किंवा शैक्षणिक तणाव ह्यांचा समावेश असेल तर ह्यामध्ये मदत करू शकणार्या संस्था व संघटनांची माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे. आपण तिकडे संपर्क साधू शकता.

plus

जर तुम्ही किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीने सुसाईड चा किंवा स्वतःला इजा पोहोचवायचा प्रयत्न केला असेल तर तुम्ही:

1. 102 किंवा 108 नंबर फिरवून नॅशनल अॅंम्ब्यूलंस सर्विसला फोन करावा
2. जवळच्या रुग्णालयात आपत्कालीन विभागात जावे

जर तुम्हाला सुसाईडचे विचार येत असतील तर

आपले मन मोकळे करा

तुमच्या एखाद्या जवळच्या विश्वासू व्यक्तीशी संवाद साधून मनातले विचार व्यक्त करावेत. ह्यामध्ये मित्रमैत्रिणी, नातेवाईक, क्रायसिस हेल्पलाईन किंवा एखादी ऑनलाईन/टेलेफोन सेवा ह्यांचा समावेश होतो.


स्वतःला थोडा वेळ देऊन आपला निर्णय पुढे ढकलण्याचा प्रयत्न करावा

तुमच्या सुसाईडच्या विचारांवर कार्य करायच्या आधी एक दिवस थांबण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा, तो क्षण निघून जाऊ द्या.


धोकादायक वस्तूंशी संपर्क टाळावा

तुम्ही स्वतःला हानी पोहोचवण्यासाठी वापरू शकता अशा कोणत्याही गोष्टी तुमच्या आसपास ठेऊ नका किव्हा काढून टाका.. ह्यामुळे तुम्हाला सुरक्षित वातावरणात राहून नीट विचार करायला वाव मिळेल


जगण्याची उमेद जागवावी

एखादी महत्वाची किंवा जवळची व्यक्ती अथवा वस्तू जसे की, फोटो, पत्र ई. जवळ ठेवावे ज्याने तुम्हाला जगण्याचे कारण मिळेल व भविष्याबद्दल अशा निर्माण होईल.


लक्ष विचलित करावे

आत्ताच्या सुसाईडच्या विचारांपासून लक्ष विचलित कसे करता येईल त्याचे मार्ग शोधावे

किती उपयुक्त हे पान होते का?

अभिप्राय आम्हाला आमची सामग्री आणि संसाधने सुधारण्यात मदत करतो जेणेकरून प्रत्येकासाठी अनुभव अधिक चांगला होईल.