© 2023 आउटलिव | सेवा की शर्तें | गोपनीयता धोरण
हस्तक्षेप
एक तरुण व्यक्ती ज्यांच्या मनात सुसाईडचे विचार येत आहेत त्यांना एकटे आणि एकाकी वाटू शकते. विशेषतः वंचित समाजातील तरुणांना ह्याबाबत मदत घेणे अवघड ठरू शकते. सेवा कमी प्रमाणात उपलब्ध आहेत व अनेकदा तरुणांच्या गरजा किंवा पार्श्वभूमीला उपयुक्त नसतात.
‘Peer’ (पियर) म्हणजे अशी व्यक्ती ज्यांना आपल्यासारखेच अनुभव आलेले असतील किंवा ज्यांची सामाजिक पार्श्वभूमी तुमच्याशी मिळतीजुळती आहे. जेव्हा एखादी व्यक्ती तणावाखाली असेल, त्यांच्या मनात जर सुसाईडसंबंधी विचार येत असतील तेव्हा आपली परिस्थिती समजून घेणाऱ्या व्यक्तीशी (पियर) संवाद साधून, त्यांच्याकडून भावनिक आधार घेणे उपयुक्त ठरू शकते. म्हणूनच पियर सपोर्ट पुरवणे हा आउटलिवच्या सुसाईड प्रतिबंधाचा एक महत्वाचा भाग ठरतो.
आउटलिव चॅट ही एक मोफत सुविधा आहे जी तरुणांच्या योगदानातून व संशोधनामधून तयार झाली आहे. संशोधन दाखवते की सुसाईडबद्दल विचार बाळगणाऱ्या तरुण व्यक्ती एका पियरची चॅटद्वारे निनावी मदत मागणे पसंत करतात. आउटलिव चॅट हा 18 ते 24 वयोगटातील तणावग्रस्त व आयुष्य संपवण्याचा विचार करत असलेल्या तरुणवर्गासाठी बनवलेला एक सुरक्षित मंच आहे जिथे ते एका पियर सपोर्टरकडून निनावी, चॅटरुपी भावनिक आधार घेऊ शकतात.
आमच्या पियर सपोर्टरशी आउटलिव चॅट वर संवाद साधण्यासाठी, तुमची स्वतःची सुरक्षा योजना बनवण्यासाठी आणि स्वतःची काळजी घेण्याचे साधने आणि इतर संसाधने साठी ह्या लिंक वर क्लिक करा https://chat.outlive.in.
आउटलिवच्या पियर सपोर्ट प्रोग्रॅमद्वारे सुसाईड प्रतिबंधात्मक पियर सपोर्ट तरुणांपर्यंत परिणामकारकरीत्या पोहोचवण्याचे उद्दिष्ट्य सध्या करता येईल. आम्ही भारता मधील तरुण पियर सपोर्टर्सचा असा एक गट तयार करत आहोत जे तणावग्रस्त किंवा जे त्यांचे जीवन संपवण्याचे विचार करत आहेत अश्या तरुणांना चॅटद्वारे भावनिक आधार देऊ शकतील. आउटलिव मधील पियर सपोर्टरर्सना आमच्या पियर मेंटॉर्स (mentors) कडून गटामध्ये व वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन मिळते.
आउटलिव टीम (team) द्वारे प्रशिक्षित पियर सपोर्टर्स आणि पियर मेंटॉर्सचा आउटलिव प्रोग्रॅममध्ये समावेश आहे. आउटलिव ज्या तरुणांना सुसाईड प्रतिबंध कार्यामध्ये काम करण्याची इच्छा असेल ते पात्रतेनुसार (खालील वर्णन केलेलं) पियर सपोर्टर किंवा पियर मेंटॉर्स म्हणून आउटलिव साठी काम करू शकतात.
आउटलिव साठी पियर सपोर्टर होण्यासाठी मानसिक आरोग्यसंदर्भात किंवा सुसाईड प्रतीबंधाबाबत काही पार्श्वभूमी किंवा शिक्षण असणे गरजेचे नाही.
आम्ही अशा तरुणांच्या शोधात आहोत जे:
जर तुम्हाला तरुणांमधील सुसाईड प्रतिबंधासाठी काम करायची इच्छा असेल तर आउटलिव पियर सपोर्टर होण्यासाठी आजच अर्ज करा!
आम्ही अशा तरुणांच्या शोधात आहोत जे:
ह्या कामासाठी पुढील अनुभव असणे अपेक्षित आहे: पियर सपोर्ट, हेल्पलाईन्स किंवा सुसाईड प्रतिबंध सेवांसाठी काम, काउन्सेलिंग (समुपदेशन), सायकोसोशल सपोर्ट, प्रशिक्षण देणे, मार्गदर्शन व सुपरव्हिजन करणे पीअर मेंटॉर बनण्याबद्दल अधिक जाणून घ्या.