© 2023 आऊटलाइव्ह | सेवा की शर्तें | गोपनीयता धोरण
जेव्हा तुम्ही आत्महत्येचे विचार अनुभवत असाल तेव्हा धोरणे आणि संसाधने.
आउटलिवच्या पियर सपोर्ट प्रोग्रॅमद्वारे सुसाईड प्रतिबंधात्मक पियर सपोर्ट तरुणांपर्यंत परिणामकारकरीत्या पोहोचवण्याचे उद्दिष्ट्य सध्या करता येईल. आम्ही दिल्ली, मुंबई व पुण्यामधील तरुण पियर सपोर्टर्सचा असा एक गट तयार करत आहोत जे तणावग्रस्त किंवा नैराश्य आलेल्या तरुणांना चॅटद्वारे भावनिक आधार देऊ शकतील. आउटलिव मधील पियर सपोर्टरर्सना आमच्या पियर मेंटॉर्स कडून गटकार्याद्वारे व वैयक्तिक मार्गदर्शन मिळते.
आउटलिव पियर मेंटॉर म्हणून तुम्ही तरुणांमधील सुसाईड प्रतिबंधात्मक कार्यात मदत करू शकता आणि बदल घडवून आणू शकता!
आम्ही अशा तरुणांच्या शोधात आहोत जे:
ह्या कामासाठी पुढील अनुभव असणे अपेक्षित आहे: पियर सपोर्ट, हेल्पलाईन्स किंवा सुसाईड प्रतिबंध सेवांसाठी काम, काउन्सेलिंग (समुपदेशन), सायकोसोशल सपोर्ट, प्रशिक्षण देणे, मार्गदर्शन व सुपरव्हिजन करणे
आऊटलाइव्ह पीअर मेंटॉर बनण्यास इच्छुक असलेल्या तरुणांसाठी आमच्याकडे 2-टप्प्यांची निवड प्रक्रिया आहे.
निवडलेले तरुण आउटलाइव्ह पीअर मेंटॉर म्हणून ऑनबोर्ड होण्यापूर्वी तरुणांच्या आत्महत्या प्रतिबंध, मार्गदर्शन आणि सुविधा कौशल्यांसाठी पीअर सपोर्टचे प्रशिक्षण घेतील.
आउटलिव पियर मेंटॉर्स:
आउटलिव पियर मेंटॉर्स 30 तासांचे ऑनलाईन व ऑफलाईन प्रशिक्षण पूर्ण करतील. ट्रेनिंग नंतर मेंटॉर्स कमीत कमी 6 महिन्यांसाठी दर आठवडा 27 तास काम करतील अशी अपेक्षा आहे.
आउटलिव पियर मेंटॉर म्हणून काम करण्याची ही पार्ट टाईम (part-time) सशुल्क संधी आहे.
पियर मेंटॉरसाठीचे अर्ज आम्ही नियमितपणे खुले करतो आहोत. आउटलिव पियर मेंटॉर म्हणून काम करण्यासाठी हा अर्ज भरावा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा [email protected]
अभिप्राय आम्हाला आमची सामग्री आणि संसाधने सुधारण्यात मदत करतो जेणेकरून प्रत्येकासाठी अनुभव अधिक चांगला होईल.